भीक मागायला लावणारे दोघे तोफखाना पोलिसांच्या ताब्यात

नगर – शहरातील कोठला परिसरात अपंग मुलास भीक मागायला लावणारे दोघे तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, दुपारी 4 ते 5 च्या सुमारास कोठला परिसरामध्ये येथील नागरिकांना दोन अनोळखी संशयितरीत्या फिरताना दिसले.

यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवित तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळविताच त्यांनी कोठला परिसरातून दोन अनोळखी आरोपींना ताब्यात घेतले. तसेच एक अपंग व मतिमंद शेख जुबेर मन्सूर (रा. संभाजी नगर, परळी वैजनाथ) या मुलास हे भीक मागण्यास लावत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत या अपंग मुलाचे नातेवाईक शेख तय्यब दादामियॉं (रा. नवनागापूर) यांच्याकडून या मतिमंद मुलाची ओळख पटली असून, याप्रकरणी परळी वैजनाथ येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात 25 मार्च 2017 रोजी हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुढील कारवाईसाठी संभाजी नगर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सयुंक्तीकपणे कारवाई करून या दोघांच्या पाठीमागे मोठे रॅकेट आहे का? याची कसून चौकशी करणार असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
2 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)