भिवरीत महिलांना शिवण काम प्रमाणपत्र वाटप

गराडे – भिवरी (ता. पुरंदर) येथील 34 महिलांनी फॅशन डिझाइन व शिवण काम कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, उपसभापती दत्तात्रय काळे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भिवरी ग्रामपंचायत,जनसेवा चॅरिट्रेबल सेंटर पुणे, प्रहार अपंग क्रांती आदोलन पुणेच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या वतीने भिवरीत महिलांसाठी फॅशन डिझाइन व शिवण काम हे दोन महिन्यांचे कोर्सेस घेण्यात आले होते. कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, प्रहार सघंटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सुरेखा ढवळे, जनसेवा चॅरिट्रेबल सेंटरचे अविनाश खाटीक पाटील, अनिता खाटीक पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत येळवंडे, काजल गायकवाड, भरत गायकवाड, शकंर घाटे, पोपट कटके, संगिता भिसे, तसेच ग्रामस्थ, सहभागी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेखा ढवळे यांनी केले तर, अविनाश निगडे यांनी आभार मानले.
भिवरी (ता. पुरंदर) : येथे फॅशन डिझाइन व शिवण काम कोर्सेस पूर्ण केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)