गराडे-भिवरी (ता. पुरंदर ) येथील श्रीनाथ गोसावीबुवा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजी बबनराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. माजी अध्यक्ष महादेव ज्ञानोबा फडतरे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी पवार यांची निवड झाल्याची माहिती खजिनदार उत्तम कान्हू कटके यांनी दिली. श्रीनाथ गोसावीबुवा तरुण मंडळाच्या माध्यमातून चांगले सामाजिक काम केल्याबद्दल मावळते अध्यक्ष महादेव फडतरे यांचा व नवीन अध्यक्ष शिवाजी पवार यांचा सन्मान पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी भाजप युवामोर्चा उपाध्यक्ष संदीप कटके, उपसरपंच भरत गायकवाड, दिलीप कटके, दत्तात्रय के. कटके, नाथाभाऊ कटके, तानाजी कि. कटके, रघुनाथ ढवळे, दत्तात्रय कि. कटके, दत्तात्रय बा. कटके, अशोक कटके, दत्तात्रय गायकवाड, हनुमंत कटके, मोहन गायकवाड, सुनील गोफणे, जयवंत साळुंके आदीसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)