भिवडीत राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

  • रामोशी समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानवंदना

सासवड – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना त्यांच्या पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथील जन्मगावी असणाऱ्या हुतात्मा स्मारकात 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांतीदिनी महाराष्ट्र राज्य बेरड, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे उपस्थित होते. यावेळी राज्यातील रामोशी समाज बांधवांच्या वतीने पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
8 ऑगस्ट रोजी रामोशी समाजाच्या वतीने क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, राम शिंदे, रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष दौलत शितोळे, शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांची रामोशी समाजाच्या विविध मागण्यांबत चर्चा झाली.
यामध्ये आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करणे आणि राजे उमाजी नाईक यांच्या भिवडी या जन्मगावी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणे, रामोशी समाजाचे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रात प्रस्ताव पाठविणे, रामोशी समाजाच्या वतनी जमिनी बिनशर्त परत करणे या मागण्या मान्य करण्यात आल्या.
याबद्दल दौलत शितोळे यांचा भिवडीत सत्कार करण्यात आला. उमाजी नाईकांचे वंशज रमण खोमणे, संजय जाधव, गणपत शीतकल, पांडुरंग रोडे, बापू मोकाशी, विठ्ठल मोकाशी, पोपट खोमणे, माऊली खोमणे, रोमोशी कृती समितीचे साहेबराव जाधव, शिवाजी चव्हाण, अमृत भांडवलकर, गणेश खोमणे, विकास भांडवलकर, अमोल खोमणे, लालासाहेब भंडलकर यांसह पुरंदर तालुक्‍यातील रोमोशी कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. गंगाराम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर धनंजय भांडवलकर यांनी आभार मानले.
याबाबत शितोळे म्हणाले की, हा विजय माझा एकट्याचा नसून राज्यातील समस्त बेरड, बेडर रामोशी समाजाच्या एकजुटीचा आहे. मी केवळ तुमचा प्रतिनिधी म्हणूनच काम पाहत आहे. त्या बरोबरच या मागण्या सध्या मान्य झाल्या असून त्यांची पूर्तता पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. आणि राजे उमाजी नाईक यांना हेच खरे अभिवादन असेल. आगामी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)