भिवडीत यशवंराव कला क्रीडा महोत्सव उत्साहात

गराडे/जवळार्जून – पंचायत समिती पुरंदरच्या शिक्षण विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भिवडी येथील (ता. पुरंदर) हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूलमध्ये धावणे, गोळाफेक, चेंडूफेक, उंचउडी, लांबउडी, वकृत्व, कबड्डी, खो-खो, भजन, लोकनृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रप्रमुख आनंदी घोरपडे, भिवडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, संदीप कदम, संजय लवांडे, दत्तात्रय फडतरे, मनोज सटाले आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)