भिवंडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, 15 गोदामे खाक

भिवंड – येथील गायत्री नगर परिसरातील सरदार कंपाऊंडमधील एका भंगार गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. यात आजूबाजूची सुमारे 15 भंगारची गोदामे जळून खाक झाली. मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळाले नसून त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भंगार साहित्य व प्लास्टिक मोठ्याप्रमाणात असल्याने आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील अग्निशामक दलाने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दाट लोकवस्ती असल्याने परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या आगीत काही झोपड्याही जळाल्याचे सांगण्यात येते. स्थानिकांनी झोपड्यातील लोकांना बाहेर काढले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)