भिवंडीतील अनधिकृत बांधकाम पंधरा दिवसांत पाडणार

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मौजे कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे (अंजूर) या गावांच्या हद्दीलगत असलेले अनधिकृत गोदाम बांधकाम पंधरा दिवसांच्या आत संयुक्त पथकामार्फत पाडण्यात येईल. प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्यास ही कारवाई करण्यात येईल,असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य धनंजय मुंडे यांनी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील अनधिकृत गोदाम बांधकामे असल्याची लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना पाटील बोलत होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) हा भाग येतो. या विकास प्राधिकरणास अनधिकृत गोदाम बांधकाम केल्याचे आढळल्यास वीज व पाणी तोडण्याचे निर्देश देण्यात येतील,असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)