भिवंडीच्या कोर्टात राहुल गांधींची हजेरी

कोर्टापुढे म्हणाले की दोषी नाही


संघाच्या विरोधातील वक्तव्याबद्दल बदनामीचा खटला

ठाणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी येथील कोर्टात राजेश कुंटे नावाच्या एका नागरीकांने खटला दाखल केला असून त्या संबंधातील सुनावणीच्यावेळी राहुल गांधी हे आज तेथे उपस्थित राहिले. न्यायाधिश ए. आय. शेख यांनी सुनावणीच्यावेळी त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवल्यावर त्यावर मी दोषी नाही असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.

एका निवडणूक प्रचार सभेच्यावेळी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेक संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्या वृत्ताची माहिती वाचल्यानंतर राजेश कुंटे यांनी त्यांच्या विरोधात संघाच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या कारणावरून हा खटला दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 2 मे रोजी या विषयी झालेल्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहून आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राहुल गांधी यांनी आज येथे उपस्थित राहून आपल्यावरील आरोपांत आपण दोषी नाही असे प्रतिपादन केले.त्यानंतर त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अन्वये आरोप ठेवण्यात आले.या कलमांमध्ये, दोन वर्षाच्या साध्या कारावासाच्या किंवा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे. तथापी या तारखेला मात्र राहुल गांधी यांना कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. या प्रकरणात राहुल गांधी यांनी माफी मागितली तर त्यांच्यावरील खटला मागे घेण्याची तयारी कुंटे यांनी दर्शवली होती पण राहुल गांधी यांनी माफी न मागता खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)