भिलवडे गावाच्या एकोप्याने झाली जलक्रांती

श्रमदानाता मोठा सहभाग : ग्रामस्थांच्या साथीने मिळाले सर्वांना पाणी
पाथर्डी – भिलवडे गावाने दाखविलेल्या एकोप्याने गावात जलक्रांती घडून आली आहे. यापुढील काळातही अशीच एकी दाखवून गावाचा सर्वांगीण विकास करून घ्या व गावची ओळख राज्यपातळीवर निर्माण करण्याचा प्रयत्न करा. असे मत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब ढाकणे यांनी केले.
भिलवडे येथे भाजपा किसान मोर्च्याच्या वतीने श्रमदान करण्यात आले. श्रमदान करण्याच्या आगोदर गावामध्ये मुख्य चौकात ग्रामस्थांनी सभेचे आयोजन केले होते. या सभेचे अध्यक्षपदावरून ढाकणे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भटक्‍या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बंडू जायभाय, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढाकणे, शहर उपाध्यक्ष नितिन एडके उपस्थित होते.
पाणी फाउंडेशन जैन संघटना तसेच गावातील लोकांच्या लोकवर्गणीतून जलसंधारणाचे सर्वात मोठे काम करण्यात आले आहे. या कामाला भाजपा किसान मोर्चाच्या वतीने श्रमदान करून गावकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यात आले.
यावेळी ढाकणे म्हणाले की, पाथर्डी हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्‍यात मोठे प्रकल्प नसल्याने पाणी साठवणे व भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गावागावात श्रमदानाच्या माध्यमातून जलक्रांती निर्माण झाली आहे. पाणी अडवण्याची व जिरवण्याची महत्त्व लोकांना समजू लागले आहे. तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेची झालेली कामे पुढील काळात तालुक्‍याची दुष्काळी ओळख पुसण्यास महत्वाची ठरणार आहेत. भिलवडे गावाच्या विकासासाठी आगामी काळात शक्‍य होईल ती मदत आपण करणार असल्याचे आश्वासन ढाकणे यांनी शेवटी दिले.
भाजपा किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांबरोबर गावातील सुभाष बडे , नागेश बडे , बाबुराव बडे, संजय बडे, रामकृष्ण बडे, विलास बडे, सोसायटी चेअरमन बाबुराव बडे, खुशाल बडे, बाबुराव कदम, दिगंबर बडे , संभाजी बडे, सुरेश बडे आदी ग्रामस्थांनीही श्रमदान केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)