भिऱ्यात देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद!

मुंबई: राज्यभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील भिरा इथे गेल्या 24 तासात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. भिऱ्यातील कालचे तापमान 45 अंश सेल्सियस इतके होते. स्कायमेटने याबाबतची माहिती दिली.

गेल्या वर्षी 28 मार्चला भिरा इथले तापमान हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच 46.5 इतके होते. त्यावेळी वेधशाळेची अनेक पथके भिरा इथे दाखल झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भिरा इथे गेल्या वर्षीची प्रचिती येत आहे. मुंबईचे रविवारचे तापमान तब्बल 8 अंशाने वाढून ते 41 अंशापर्यंत पोहोचले. हे 2011 नंतर सर्वात जास्त तापमान आहे.

केवळ मुंबईच नाही तर उष्णतेची झळ संपूर्ण राज्याला बसली आहे. उष्णतेमुळे  मराठवाडा आणि विदर्भातील तापमानने चाळीशी ओलांडली आहे. ब्रम्हपुरी, अकोला वर्धा, सोलापूर, परभणी इथं तापमान जवळपास 40 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले.  तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथेही तापमान 37 ते 39 अंश होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)