भिमा नदीला पूर

19 धरणांतून 42 हजार 200 क्‍सुसेकने विसर्ग
देऊळगावराजे, – जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यामुळे भीमा नदीला पुर आला आहे. भीमा नदीत पिंपळगाव जोगे, मणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, भामा असखेड, चासकमान, वडिवळे, आंध्र, पवना, कासराई, टेमगर, मुळशी, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला अशा 19 धरणांतून 42 हजार 200 क्‍सुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीलगच्या गावांनाही सावधानेतेच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पाटबंधारे अधिकारी रविंद्र जाधव यांनी सांगितले.
भिमेची पातळी वाढल्याने शिरापुर-सिध्दटेक पुलाला पाणी टेकले असून पाणी वेगाने उजनी धरणाच्या दिशेने जात आहे. यामुळे उजनी धरणातील पाणीसाठीही झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या तीनच दिवसांत या हंगामातील सरासरी भरून निघाली असून खडवासलातून विसर्ग सुरूच असल्याने भिमा दुथडी भरून वाहत आहे. पाणी नदीपात्र सोडून बाहेर येण्याची शक्‍यता असल्याने दौंडच्या तहसीलदारांनीही नदीलगतच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
भिमेला पाणी वाढल्याने देऊळगावराजे येथील बीबीसी कालव्यालाही पाणी आले आहे. ऐन पावसाळ्यात पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांची पाणी काढून देण्यासाठी धादल उडाली आहे. भीमा नदीला येणाऱ्या पाण्यामुळे एक-दोन दिवसांत उजनी धरण 100 टक़्के भरेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, गतवर्षी प्रमाणे जर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर परिसरातील शेतकऱ्यांवर ऐन उन्हाळ्यात पाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)