भिमा कोरेगाव : निवेदनांवर सप्टेंबर महिन्यापासून सुनावणीला सुरुवात

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : पुण्यात 3 ते 6 ऑक्‍टोंबरला
पुणे – भिमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाकडे आलेल्या निवेदनांवर सप्टेंबर महिन्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुणे येथे दि.3 ते 6 ऑक्‍टोंबर या कालावधीत ही सुनावणी होणार आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाने मे महिन्यात भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता.

-Ads-

या घटनेप्रकरणी नागरीक आणि विविध संस्थांकडून शपथपत्राच्या स्वरुपात निवेदने मागविण्यात आली होती. त्यानुसार या आयोगाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम मुंबई येथे दि.5 ते 7 सप्टेंबर 2018 पर्यंत होणार आहे.

पुणे येथील जुन्या जिल्हा परिषदेमध्ये चौकशी आयोगाने कार्यालय स्थापन करण्यात आले असून याठिकाणी 3 ते 6 ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीत साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. सुरुवातीला ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे. त्यांना समन्स काढण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)