भिडे गुरुजींविरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही – मुख्यमंत्री

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण सध्या राज्यात वादळ निर्माण करत असताना आता याप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींविरोधात आतापर्यंत केलेल्या चौकशीत एकही पुरावा मिळालेला नाही. मात्र अजूनही चौकशी सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर दिले.

भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पाहिले, असे एका महिलेने सांगितले होते. त्यानुसार तक्रार दाखली केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रकरणाची चौकशी सुरुच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटक करण्यात आली नाही, तर त्यांच्या अटकेसाठी राज्य सरकारने सर्व प्रयत्न केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ”मिलिंद एकबोटे फरार होते, त्यांच्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. त्यांना अटक न करता चौकशी करा अशी न्यायालयाची भूमिका होती. तर कस्टडीमधील चौकशी करायची अशी पोलिसांची भूमिका होती,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल भेट घेतली आणि या प्रकरणी भिडे गुरूजींच्या सहभागाचे पुरावे देतो असे सांगितले. त्या पुराव्याचेही विश्लेषण केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना गंभीर आहे. यामध्ये माझ्या कुटुंबातील व्यक्ती असली तरी मी सोडणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)