भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ राज्यभर मोर्चे, सांगलीत जय्यत तयारी

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरातून मोर्चे काढण्यात येणार आहे. शिवप्रतिष्ठानने विविध जिल्ह्यात सन्मान मोर्चांचे आयोजन केले आहे. दरम्यान, सांगली किंवा साताऱ्यातील मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

या मोर्चासाठी सांगलीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. तर पुण्यातील आणि मुंबईतील मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

पुण्यात सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. यामुळे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणारा हा मोर्चा आता ओंकारेश्वर मंदिर ते लालमहालापर्यंत असा असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र मोर्चाला परवानगी न देता पोलिसांनी आझाद मैदानात सभेची परवानगी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)