भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मुंबईत एल्गार मोर्चा

मुंबई: कोरेगाव- भिमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिपकडून एल्गार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही रॅली काढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशी रॅली काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यातून विविध ठिकाणांहून आंदोलक मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, असा आरोप काल प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मुंबईकडे निघालेले मोर्चेकरी आता माघारी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ठरल्यानुसार मोर्चा निघणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला होता.

 

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)