भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव-भीमा, वढू परिसरात बंदी

पुणे – पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भिमा याठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी पावले उचलली आहेत.

पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार विविध संघटनेशी संबंधित असलेल्या 58 जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे हलविले आहे. तसेच सराईत 29 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नेमके कोणाकोणाला नोटिसा जारी केल्या आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेवा ठप्प ठेवण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. राजकुमार बडोलेंकडून जयस्तंभास अभिवादन
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील जय स्तंभास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच पुण्यात सर्व विभागांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आवश्‍यक त्या सूचना दिल्या. जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांना उच्च प्रतीच्या मुलभूत सेवा-सुविधा देण्याबरोबच सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)