भिडेंवर कारवाई करण्याचे नाशिकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश

कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्‍त संचाकांची कारवाई
पुणे,दि.12 – संभाजी भिडे यांनी केलेल्या आंबा खाल्याने मुले होण्याविषयी केलेल्या वक्‍तव्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्‍त संचालक अर्चना पाटील यांनी दिले आहेत. हे विधान त्यांनी नाशिक येथे केल्याने तेथील वैद्यकी अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश पत्र लिहून पाटील यांनी दिले आहेत.
माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने 150 जोडप्यांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा आहे त्यांना मुलगाच झाला असे वक्‍तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्यानंतर त्यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्‍त संचालक अर्चना पाटील यांनी याची दखल घेत कार्यवाही करण्याचे आदेश नाशिकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यानुसार भिडे यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले असून त्यांच्या वक्‍तव्याची शहानिशा करुन योग्य ती कार्यवाही करावी व तात्काळ विभागाला अहवाल सादर करावा असेही आदेश यामध्ये दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)