डिकसळ- भिगवण-राशीन रस्त्यावर डिकसळ येथे गतीमान वाहने येत असल्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत डिकसळ ग्रामपंचायत व युवक कॉंग्रेसच्या वतीने गतिरोधकाची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणीची दखल घेवुन बांधकाम विभागाकडून गतीरोधक बसविण्यात आला.
भिगवण राशीन रोडवर डिकसळ (ता. इंदापूर) येथे टाकळी (ता.करमाळा, जि. सोलापूर) भिगवण स्टेशन, भिगवण व राशीन आदी ठिकाणाहून येणारी वाहने सुसाट येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सरपंच सुर्यकांत सवाणे, उपसरपंच सायली सुहास गायकवाड, युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनिल काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी केली होती व याबाबत पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ग्रामस्थांच्या मागणीची शहानिशा करुन व तेथे गतीरोधकाची गरज ओळखुन अखेर गतीरोधक बसविण्याची मागणी मान्य केली. नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीरोधक बसविण्याचे काम पूर्ण केले. यावेळी सरपंच सुर्यकांत सवाणे, सुहास गायकवाड, इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल काळे, भिमराव माळी, हेमंतराव कुंभार, दत्तात्रय काळे आदींनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व गतीरोधक बसविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)