भिगवण गटात 1 कोटींचा निधी मंजूर

संग्रहित छायाचित्र....

जिल्हा परिषद सदस्य बंडगर यांची माहिती

भिगवण- भिगवण- शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील दहा गावांमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत 1 कोटी 39 लाख 71 हजार 333 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचा सदस्य या नात्याने भिगवण गटात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे मंजूर केली आहेत. ही विकासकामे आपल्या तालुक्‍यातील आमदार दतात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यांच्या सहकार्यातून पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रांची पूर्तता आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दहा गावांतील 23 विकासाकामासाठी 1 कोटी 39 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हास्तरावरून निर्गमीत करण्यात आले आहेत. ज्या लोकवस्तीमध्ये कामे मंजूर झाली आहेत. त्याचठिकाणी ग्रामपंचायतीने कामे करावीत, असेही बंडगर यानी यावेळी सांगितले.
भिगवण गावातील दलितवस्ती सुधार योजनेतर्गत 31 लाखांची कामे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये अशोकनगर येथे रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण (17 लाख) खाटीक समाज परिसर (चार लाख पन्नास हजार) झोपडपट्टी परिसर रस्ता व बंदिस्त गटर (10 लाख) मदनवाडी येथे बारा लाखांची विकासकामे त्यामध्ये गावठाण आणि भकासवाडी सिमेंट रस्ता कॉंक्रीटीकरण, म्हसोबावाडी खंडाळेवस्ती येथे रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण (8 लाख), डाळज नंबर 2 गावठाण दलीतवस्ती (4 लाख), शिंदेवाडी येथे 39 लाखांची विकासकामे आहेत. यामध्ये मोरेवाडा मोरेवस्ती खरातवस्ती येथे रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण नळपाणी पुरवठा योजना भूमिगत गटर, प्रकाश व्यवस्था आदी कामे मंजूर झाली आहेत. निंबोडी येथे दहा लाखांची विकासकामे सोनवणे वस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण हरिजनवस्ती समाजमंदिर, शेटफळगढे येथे मोरेवस्ती प्रकाशव्यवस्था (4 लाख 50 हजार), काझड येथे 24 लाखांची विकासकामे गावठाण आणि खरातवस्ती समाजमंदिर गावठाण भूमिगत गटर आणि चव्हाणवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण, कुंभारगाव येथे बौद्ध (2 लाख 63 हजार), डिकसळ येथे सवानेवस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण ( 90हजार) आदी विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)