भिगवणमध्ये 55 पिशव्या रक्‍त संकलित

भिगवण- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने भिगवण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्‍तदान शिबीरात 55 पिशव्या रक्‍त संकलित करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, संपत बंडगर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्‍तदान शिबीराचे उद्‌घाटन केले. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, सरपंच हेमा माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, प्रशांत शेलार,महेश शेंडगे,ड. पांडुरंग जगताप, आबा बंडगर, पत्रकार संघाचे अध्यक्ष दादा थोरात, भरत मल्लाव, नितीन चितळकर, सुरेश पिसाळ, तुषार हगारे, काशिनाथ सोलनकर, नारायण मोरे, देवानंद शेलार, बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते. पोलीस याबरोबर वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रक्‍तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली. अमोल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, भिगवण येथील येथील अमरबौद्ध युवक संघटनेच्या वतीने बौद्ध विहारांमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव व अशोक काटे यांचे हस्ते ध्वजवंदनाने जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)