भिगवणमध्ये रस्त्यावरच भरतेय भाजी मंडई

संग्रहित छायाचित्र

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी हैराण


रस्त्यावरच वाहनांची पार्किंग

डिकसळ –भिगवण शहराच्या मध्य भागातून जाणारा पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या रस्त्यावरच भाजी मंडई भरत असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडे कोणतीही पार्किंग व्यवस्था नसल्याने पार्किंगसाठी रस्त्याचा वापर केला जात असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे हायवे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.
दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर दिवसभर उभी करून ठेवली जात असल्याने या रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत सतत भर पडत आहे. बाहेरून येणारे वाहन चालक वाहने रस्त्यालगत लावून निघून जात आहेत. येथे सतत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

शहरातील मुख्य बाजारपेठ, भैरवनाथ विद्यालय रस्ता दरम्यान वाहतूक कोंडीची ही समस्या भेडसावत आहे. मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फुटवेअर, कपडे, फर्निचर, खाद्य पदार्थ आदींची येथे दुकाने आहेत. बहुतेक व्यापाऱ्यांनी वाढीव बांधकामे, अतिक्रमणे करून त्यांचे जाहिरात फलक आणि माल थेट पदपथांवर मांडलेला असतो, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण?
भिगवणची भाजी मंडई स्थलांतर करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करून देखील काही गाव पुढाऱ्यांचा विरोध झाल्याने स्थलांतर होऊ शकले नाही. मात्र, सध्या भरत असलेल्या मंडई महामार्गालगत असल्याने एखाद्या वेळी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)