भिगवण- येथील नवीन बाजारपेठेत बुधवारी (दि. 12) मध्यरात्री आठ दुकाने फोडून 32 हजार 500 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन पेठेतील एकूण 8 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. या आठ पैकी तीन दुकानांतून माल लंपास केला आहे. यात शाही मोबाईल शॉपीतून पाच मोबाईल त्यांची किंमत 17 हजार 500 तर रोहित मोबाईल शॉपीमधून जुने दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल त्यांची किमत 13 हजार रुपये तसेच आर्या फुटवेअरमधून स्पार्क कंपनीचे 3 शूज, सॅडल व स्लीपर चप्पल असा 3 हजार रुपयांचा माल व 1 हजार रुपये रोख असा एकूण माल 32 हजार 500 रुपयाची चोरी करण्यात आली आहे. तर बाकी 5 दुकानाची फक्त शटर तोडण्यात आली आहेत. या दुकानातून काही चोरी करण्यात आली नाही. तर याबाबतची तक्रार महावीर यादवराव काळे यांनी दिली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड करीत आहेत, अशी माहिती पोलीस शिपाई अविनाश काळे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)