भिगवणमध्ये काढला मोर्चा

भिगवण- मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला भिगवण येथे 100 टक्के प्रतिसाद मिळाला. भिगवण व परिसरातील हजारो मराठा युवकांनी आरक्षणच्या मागणीच्या घोषणा देत मोर्चा काढला, तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, बंद पूर्व नियोजित असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर शुकशुकाट होता.
मराठा क्रांती समितीने मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मोर्चा काढून तो पुणे सोलापूर बायपासने सरळ भिगवण पोलीस ठाण्यासमोरून भिगवण गावातून मुख्य बाजारपेठेतून तक्रारवाडी मार्गे मदनवाडी चौफुला मार्गे दुसऱ्या बायपासने सागर हॉटेलसमोर पुणे-सोलापूर महामार्गावर एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिला आंदोलकांनी आपले मनोगत व्यक्‍त करीत या सरकारचा निषेध नोंदविला. तसेच यावेळी जमलेल्या शेकडो युवकांनी मुंडन करून या सरकारचा निषेध करीत आजचा मोर्चा शांतते पार पाडण्यात समितीला यश आले.
यावेळी मराठा आरक्षणं मिळावे तसेच मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत या मागण्याचे निवेदन भिगवण पोलीसचे सहायक निरीक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. तसेच महसूल विभागाला यावेळी निवेदन देण्यात आले. या बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक निळकंठ राठोड यांनी बुधवार (दि. 8) रात्री पासूनच चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी रमेश जाधव, प्रकाश ढवळे, राजकुमार मस्कर, एम. जी. जगताप, सुनील काळे, रामचंद्र कदम, सुनील वाघ, प्रशांत वाघ, माउली जगदाळे, किशोर काळंगे आदींसह हजारो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऍड. पांडुरंग जगताप म्हणाले की, मराठा समाज्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत गनिमी काव्याने कधी कोठे ही तीव्र आंदोलन करण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)