भिगवणमध्ये एक मुठ धान्यास प्रतिसाद

भिगवण- येथील रोटरी क्‍लब ऑफ भिगवणने राबविलेल्या एक मुठ धान्य वंचितासाठी या उपक्रमास दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अनेकांच्या तोंडत घास भरविण्यात आले आहे.
या उपक्रमाध्ये 20 शाळांतील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्‍लबकडे जमा केले तर येथील सचिन फॅन क्‍लबनेही या उपक्रमात सहभाग घेत 25 हजार रुपयांचे धान्य जमा केले. जमा झालेले धान्य परिसरातील सहा वृद्धाश्रम, अनाथ व मतीमंद विद्यालयांना वितरीत करण्यात आले. या उपक्रमांमुळे वंचितांना मदत मिळण्याबरोबरच मुलांच्या मधील संवेदना जागृत होण्यास देखील हा उपक्रम प्रयोगशिल असल्याने यातून चांगले संस्कार रुजवले जात असल्याने शाळा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहे. यामध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लीश स्कूल, भैरवनाथ विद्यालय भिगवण, आदर्श माध्यमिक विद्यालय (तिनही शाळा भिगवण), जिल्हा प्राथमिक शाळा तक्रारवाडी, डिकसळ व पोंधवडी आदी 20 शाळातील मुलांनी 55 पोती धान्य जमा केले. जमा झालेल्या धान्य गरजु संस्थापर्यंत पोहोचविण्याचा कायर्क्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी भिगवण रोटरी क्‍लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, अध्यक्ष नामदेव कुदळे, रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. भारत भरणे, संदीप वाकसे, प्रसाद क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी, ज्ञानप्रबोधिनी मतीमंद विद्यालय कोर्टी, अविश्री बालसदन दौंड, यशोधरा संस्था बारडगांव, निवासी मतीमंद विद्यालय वागज, समर्थ मुकबधीर विद्यालय, इंदापूर या संस्थाना जमा झालेल्या धान्याचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)