भिक्षेकरी महिलेस मारहाण ; महिला कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा

भिक्षेकरी महिलेस मारहाण ; महिला कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
पुणे,दि.19-फुलेनगर येथील भिक्षेकरी संस्थेत एका भिक्षेकरी महिलेला कामगार महिलेकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव  पालखे असे असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एका 45 वर्षीय भिक्षेकरी महिलेने फिर्याद दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना महिला पोलीस हवालदार वैशाली व्ही.जे.अभंगराव यांनी सांगितले, फुलेनगर येथे महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत भिक्षेकरी केंद्र आहे. डेक्कन पोलिसांनी भिक्षेकऱ्यांवर केलेल्या कारवाईतील भिक्षेकरी न्यायालयाच्या आदेशाने येथे दाखल करण्यात आले आहेत. दहा भिक्षेकऱ्यांमागे एक कर्मचारी अशी येथील व्यवस्था आहे. येथे दि.8 सप्टेंबर रोजी फिर्यादी असलेल्या भिक्षेकरी महिलेची तेथील महिला कर्मचाऱ्याशी वादावादी झाली होती. या वादावादीत महिला कर्मचाऱ्याने संबंधीत भिक्षेकरी महिलेला काठिणे व हाताने मारहाण केली. यामध्ये तीच्या छातीला काठी लागल्याने जखम झाली होती. याप्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)