भिंद्रानवालेंच्या फोटोमुळे मुख्यमंत्र्यांनी टाळली गुरूद्वाराची भेट

गावकऱ्यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने
कर्नाल – हरियानातील दाचर गावातील एका गुरूद्वारात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे भेट देण्यासाठी जाणार होते. पण त्या गुरूद्वारात विघटनवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांचा लावण्यात आलेला फोटो काढण्याची सुचना मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरूद्वाराच्या प्रशसकीय समितीला केली पण त्यांनी तेथील हा फोटो काढण्यास नकार दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या गुरूद्वाराची भेटच रद्द केली.

आता त्यावरूनही तेथे एक नवीन वाद उद्‌भवला असून मुख्यमंत्र्यांनी गुरूद्वाराची भेट रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या वादाच्या संबंधात माहिती देताना मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले की मी स्वता या दौऱ्यात गुरूद्वाराच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवला होता. पण तेथे भिंद्रानवाले यांचा फोटो असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. मी तो फोटो काढण्याची सुचना केली होती पण त्यांनी ती मानली नाही त्यामुळे मी हा दौरा रद्द केला. अजूनही त्यांनी तो फोटो काढला तर आपण तेथे नक्कीच दर्शनाला जाऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरूद्वारा समितीने सांगितले की मुख्यमंत्र्यांचा दौरा या कारणामुळे रद्द झाल्याची माहिती आम्हाला स्थानिक प्रशासनाने दिली नाहीं त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि गावातील शिख नागरीक संतप्त झाले.खट्टर यांच्या या बहुप्रशिक्षित दौऱ्यासाठी अनेक शिख भाविक या ठिकाणी जमले होते. पण त्यांना हा दौरा रद्द झाल्याचे समजताच त्यांनी हिंसक निदर्शने करीत काही ठिकाणी जाळपोळही केल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)