भिंतीला धडकूनही विमान उडतच राहिले 

दुबईकडे निघालेले एअर इंडियाचे विमान मुंबईत उतरवले 
136 प्रवासी व कर्मचारी आश्‍चर्यकारकरित्या वाचले 
मुंबई: एअर इंडियाच्या विमानाने त्रिचीहून दुबईसाठी उड्‌डाण केल्यानंतर हे विमान अपेक्षित उंची गाठू शकले नाही, त्यामुळे ते थेट विमानतळाच्या कंपाऊंड भिंतीलाच धडकले. त्यात विमानाच्या पोटाकडील भागाचे बरेच नुकसान झाले पण हे विमान तसेच पुढे हवेत झेपावले. सुमारे चार तास हे विमान हवेत उडत होते. पण अपघातात विमानाचे बरेच नुकसान झाल्याचे लक्षात येताच ते विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. विमानातील 136 प्रवासी यातून आश्‍चर्यकारकरित्या बचावले आहेत.
हे विमान मुंबईत उतरवल्यानंतर विमानाचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आले आहे. केवळ चमत्कार म्हणूनच यात मोठा अपघात टळला. आणि चार तासांच्या प्रवासानंतर विमान मुंबईत यशस्वीपणे उतरवण्यात आले. या प्रकाराची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्रिचीहून दुबईसाठी हे विमान निघाले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला विमानाने उड्डाण केले. पण धावपट्टीवरून ते पुढे गेल्यानंतरही विमानाला अपेक्षित उंची गाठता आली नाही त्यामुळे ते विमानतळाच्या सुरक्षा भिंतीला धडकले पण त्यानंतरही ते तसेच पुढे नेण्यात वैमानिकाला यश आले. याची कल्पना नियंत्रण कक्षातून विमानाच्या कमांडला देण्यात आली त्यावेळी विमानाची सर्व यंत्रणा व्यवस्थीत सुरू असल्याची माहिती वैमानिकाने दिली. पण यात विमानाच्या पोटाकडील भागाचेही मोठे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते मुंबईकडे वळवून तेथे उतरवण्यात आले.
कॅप्टन डी गणेशबाबू हे विमान चालवत होते तर कॅप्टन अनुराग हे त्यांचे सहवैमानिक म्हणून कॉकपिटमध्ये बसले होते. विमान सीमाभिंतीला धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी 250 किमी इतका होता. विमानाच्या धडकेने सीमा भिंतीचा बराच भागही कोसळला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)