भाषा टिकवण्याची जास्त जबाबदारी साहित्यिकांवर

विरंगुळा केंद्रातील साहित्यिक कट्ट्याचे उद्‌घाटन

वारजे- भाषा टिकवण्याची सर्वात जास्त जबाबदारी साहित्यिकांवर आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो. परंतू आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

-Ads-

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत वारजे येथील कै. गंगाबाई धुमाळ बोलोद्यान व विरंगुळा केंद्रात सुरु करण्यात आलेल्या साहित्यिक कट्ट्याचे उद्‌घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक न. म. जोशी, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे, डॉ. माधवी वैद्य, गोरे काका, वि. दा. पिंगळे, कार्यक्रमाचे संयोजिका नगरसेविका दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, नवीन पिढी वाचनापासून दुर जात असून ती व्हॉट्‌सऍप व फेसबुकमध्ये अडकत चालली आहे. व्याख्यानांचे कार्यक्रमही आता कमी होत चालेले आहेत त्यामुळे या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून नविन पिढीला साहित्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील व साहित्यिकांची समाजाला दिशा देणारी चर्चा सर्वांना ऐकता येईल अशी अपेक्षा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये एक गुणी साहित्यिक होता. त्यांची संसदेतील भाषणे आज ही आम्ही एकत असतो. जेष्ठांसाठी त्यांची पुस्तके आता हेरींग बुक मध्ये उपलब्ध होत आहेत. ग. दी. माडगुळकर यांच्या बद्दलची माहिती येणाऱ्या पिढीला कळवी म्हणून त्यांच्या नावाने एक वास्तू पुण्यात व्हावी. यासाठी आमचा पाठपुरावा चालू असून ही वास्तू खडकवासला मतदार संघात व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

न. म. जोशी म्हणाले की, वाचताना अस्वस्थ करते. पण नंतर विचार करताना स्वस्थ करते. ते म्हणजे साहित्य. पुनरप्रत्ययाचा आनंद साहित्यातून मिळतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीत समाज प्रबोधन करणाऱ्या साहित्य विचाराच्या उपक्रमाला जास्त जागा मिळावी हा साहित्य कट्टयामागचा उद्देश आहे. जिथे कोणीही कट्टी घेत नाही. तो कट्टा म्हणूनच या कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर चांगली चर्चा होऊ शकते. धुमाळ म्हणाल्या, वारजे परिसरात साहित्यावर प्रेम करणारे अनेक लोक रहातात तसेच अनेक नवोदित साहित्यिक कलावंत या भागात असून त्यांना या कट्ट्याच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी टिळक यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)