भाव भगवान है

आजच्या काळांतील लोकप्रिय तांत्रिक विश्‍लेषणाच्या महत्वाच्या आधारांपैकी एक गृहितक आहे Price Discounts Everything याचाच अर्थ असा की एखाद्या शेअरच्या विशिष्ट दिवसाचा भाव हा त्या शेअरबाबतच्या त्यावेळपर्यंतच्या एकूण एक ज्ञात घटना/घडामोडींचा संभाव्य परिणाम पचवूनच ठरलेला असतो; एकूण एक ज्ञात..असे म्हणावयाचे कारण की अनेकदा घडामोडी घडतात, काही गोष्टी गोपनीय असतात वा अगदी अशा गोपनीय नसलेल्या परंतु महत्वाच्या बाबीही सार्वत्रिक व्हायला काही काळ जावा लागतो.

अशावेळी ज्यांना कोणाला ह्या महत्वाच्या बाबी’ काही कारणाने आधी कळतात ते महानुभाव तळे राखील तो..’ या न्यायाने फायदा मिळविण्याचा प्रयत्न करतातच करतात, भले हे अनैतिक वा बेकायदेशीर असले तरीही… शेवटी मनुष्यस्वभाव आहे तो.

-Ads-

सहाजिकच माहितगारांच्या या हालचालींचा परिणाम बाजारातील भावात प्रतित होतो व अशा महत्वाच्या गोष्टीचा बोभाटा होण्यापूर्वीच त्याची चिन्हे भावांत उमटतात. घोटाळाग्रस्त पीएनबी बॅंकेचा अल्पकालीन आलेख पाहता असे लक्षात येते की अधिकृतपणे घोटाळा उघडकीला आला तो काळ, 14 फेब्रुवारी. ..मात्र त्या आधी जवळजवळ महिनाभर (17 जानेवारीपासून) तेजीचा आभास निर्माण करुन 25 जानेवारीचा कडेलोट झाला आहे. भाव भगवान है. या बाजाराशी संबंधीत जुने लोक वापरत असलेल्या म्हणीकडे आपण दुर्लक्ष केले की आपल्यावर हे भगवान. म्हणायची वेळ येते ती अशी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)