भाव नसल्याने चाकणध्ये कांद्याची आवक घटली

चाकण – कांद्याचे भाव काही केल्या वाढत नसल्याने खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये शनिवारी (दि. 23) कांद्याची आवक 19 हजार क्विंटलने घसरली तर भाव 145 रुपयांने घसरले. दरम्यान, भाव वाढतील या आशेवर अद्यापही शेतकरी असल्याने त्याने काढून ठेवलेला कांदा विक्रीसाठी न आणता आरणी ठेवणेच पसंत केले केले. त्यामुळे या आठवड्यात आवक जवळपास निम्म्याने घटली आहे.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 22 हजार क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 650 वरुन 505 रुपयांवर आला. तर क्रमांक दोन कांद्याला 401 तर क्रमांक तीनच्या कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.या आठवड्यात चाकण बाजारात बटाटा आवक 370 क्विंटलने घटून भाव 50 रुपयाने वधारले. या सप्ताहात कोबी, टोमॅटो, दुधी भोपळा, वांगी, कारली, वाटाणा, शेवगा, ढोबळी मिरची, गवार, गाजर, फरस बी, वालवर या भाज्यांची आवक वाढली व भाव किरकोळ कमी जास्त वाढले. या आठवड्यात भूईमुग शेंग आवक व भाव कमी झाले, तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसणाची आवक कमी होऊन व भाव वधारले. तर भाज्यांची आवक थोड्या फार प्रमाणात वाढली. जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 90 लाख रुपये झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)