भाव जास्त तरीही सोने खरेदीत वाढ 

लग्नसराई व उत्सवामुळे मागणी वाढली 

ग्राहकांचा ओढा विश्‍वसार्ह ब्रॅण्डकडे- गाडगीळ 
धनत्रयोदशीनिमित्त पुणेकरात सोने खरेदीसाठी उत्साह आढळला असल्याचे पीएनजी ज्वेलर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यानी सांगितले. ते म्हणाले की गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सोन्याला 7 ते 10 टक्‍के जास्त मागणी आहे. ग्राहक फक्त सोन्याच्या भावाकडे पाहत नाहीत तर घडणावळ, पावती, दर्जा, ब्रॅंड, खरेदीनंतरची सेवा या बाबीकडे लक्ष देत आहेत. त्याचबरोबर या वर्षी हिऱ्याच्या दागिन्याची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी हिऱ्यांच्या दागिन्यांना 20 ते 25 टक्‍के इतकी मागणी जास्त आहे. ज्या विक्रेत्याची विश्‍वासार्हता जास्त आहे, तसेच फेरखरेदीची शक्‍यता असलेल्या विक्रेत्यांकडून लोक हिऱ्याचे दागिणे खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकानी यासाठी योग्य पावती आणि इतर बाबीची शहानिशा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ चांगला असल्याचे दिसून येत आहे. काही कारणामुळे आगामी काळात सोन्याचे दर 38 ते 40 हजार रुपये प्रति 1 ग्रॅमपर्यत जाण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबई: सहा वर्षांनी धनत्रयोदशीआधी सोन्याने दर प्रति तोळ्यासाठी 32 हजारांवर गेले आहेत. तरीही सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअरबाजारातील मरगळ पाहता, गुंतवणूकदारांची पसंतीही सोन्याला असल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दसऱ्यापासून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असून, त्यासाठी सोने खरेदी व बुकिंग सुरू झाली आहे. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल. या आधी गेल्या पाच वर्षांत धनत्रयोदशीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 30 हजार रुपयांखाली होता. मात्र, सहा वर्षांनंतर सोन्याने प्रति तोळ्यासाठी 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 2012 साली धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सोन्याचा दर 31 हजार 640 इतका होता. मात्र, यंदा सोन्याचे प्रति तोळ्याचे दर 32 हजार 160 रुपये इतके होते.

ऑनलाइन सोने खरेदीतही 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. मात्र, पारंपरिक दागिने खरेदीसाठी आजही ग्राहकांची पसंती सराफा पेढ्यांनाच असल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांना नवा साज देण्याचा ट्रेंड आल्याचे झवेरी बाजारातील सराफांनी सांगितले. या ट्रेंडमध्ये सोन्याच्या दागिन्यांत खडे, हिरे बसवण्याची मागणी होत आहे. एकंदरच यंदा सोन्याचे दर वधारूनही सराफा बाजारासाठी दिवाळी अच्छे दिन घेऊन आल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)