भावी शिक्षकांना यशाचा कानमंत्र!

चिंचवड – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाला शिक्षण मंडळ आणि प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एड. च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध व्याख्यात्यांनी भावी शिक्षकांना यशाचा कानमंत्र दिला.

कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, समन्वयक प्रा. जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. सकारात्मक होऊ द्या याविषयावर प्रा. कल्पना शिरोडे यांनी मार्गदर्शन केले. त्यो म्हणाल्या, कट्टर शत्रू व मित्र आपणच आपले असतो. दैनंदिन कामात केलेल्या चुका आपणच शोधल्या पाहिजे. दुसऱ्या पुष्पाची गुंफण करताना वक्ते डॉ. मारूती करंडे (पाटील) एकपात्री प्रयोग यावर मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टीकोन, जबाबदारीची जाणीव, यशस्वी प्रयत्न आदी पैलू मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी कसे आवश्‍यक आहे. याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसरे पुष्प गुंफताना वक्ते प्रा. मुबीन तांबोळी यांनी शिक्षक एक कलाकार या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षकांनी आत्मविश्वास सर्जनशीलता आणि चारित्र्यवान या तीनही गुणाची, पैलूची जोपासना करावी. आपल्या कामावर श्रद्धा असली पाहिजे. आत्त्मविश्वास वाढविण्यासाठी विचार महत्त्वाचा असतो, तो शिक्षणामधून येतो आणि वाचन अनुभवातून समृद्ध होतात म्हणून स्वतःला प्रोत्साहीत व उत्तेजीत करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. मनिषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)