भावी पिढी सशक्त राहण्यासाठी लसीकरण गरजेचे : सुनीता कचरे

डिस्कळ : गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना जि. प. सदस्या सौ. सुनिता कचरे व मान्यवर. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

बुध, दि. 3 (प्रतिनिधी) – भावी पिढी सशक्त व निरोगी राहण्यासाठी गोवर व रुबेला लसीकरण महत्वाचे असून मोहिमेच्या माध्यमातून गोवरचे निर्मूलन व रुबेलाचे नियंत्रण होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता कचरे यांनी सांगितले.
डिस्कळ,येथील श्रीशिवाजी विद्यालयात आयोजित गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य कैलास घाडगे, श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे, केंद्रप्रमुख अनिल कदम, वैद्यकिय अधिकारी डॉ. अजित औताडे, उपसरपंच अमोल गोडसे, ग्रामपंचायत सदस्या सौ. अर्चना शिंदे, पोलिस पाटील गणेश शिपटे, अमोल मदने, आरोग्य सहाय्यक भानुदास घाडगे, श्रीमती एम.बी. गाढवे, अंगणवाडी पर्यवेक्षिका एम.व्ही सुतार, डॉ. सतिश काळंगे, आशा गटप्रवर्तक तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. डॉ. औताडे यांनी लसीकरणाचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक आर. एम. डांगे, ज्येष्ठ शिक्षक सुनील वायदंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सांस्कृतिक विभागप्रमुख श्रीअविनाश जंगम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. समीर जमादार यांनी आभार मानले.

 

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)