भावी पिढी सक्षम करण्यासाठी बालकांची अनोखी स्पर्धा- डॉ. काळे

कोपरगाव: लहानपणापासून बालकांच्या शरीराचा योग्य विकास झाल्यास ते भविष्यात कोणत्याही आजाराला बळी पडणार नाहीत.त्यादृष्टीने योग्य ती काळजी घेतली, तर देशाची भावी पिढी सुदृढ होईल. त्यामुळेच बालकांचे आरोग्यमान उत्तम राहील, या उदात्त हेतूने सुदृढ बालकांची स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती डॉ. अतिश काळे यांनी दिली.

कोपरगाव येथील लायन्स क्‍लब व डॉ. काळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 व 3 ते 5 वर्षे वयांच्या बालकांची सुदृढ बालक ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. काळे हॉस्पिटल येथे दिवसभर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो बालकांनी सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालकांचा शारीरिक विकास होतोय की नाही, योग्य वयाप्रमाणे, अपेक्षित उंची, वजन आहे की नाही, वयाच्या व शरीराच्या तुलनेत बौद्धिक विकास कोणत्या गतीने होतोय, त्यांना नियमित कोणत्या आजारांचा सामना करावा लागतोय, त्यांच्या विविध प्रकारच्या आवडीनिवडीनुसार कोणत्या बाबीकडे बालकांचा अधिक कल आहे, यासह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. सोबतच विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन बालकांची आवड व बळकटीची चाचणी घेण्यात आली.

शिर्डी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी बालकांची बौध्दीक तपासणी केली, तर वृंदा कोहाळकर यांनी निरीक्षण व समूपदेशन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अतिश काळे यांनी बालकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांना दंतरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा काळे यांनी सहकार्य केले. कोपरगावसह पंचक्रोशितील शेकडो बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.1 ते 3 वयोगटात शौर्य शर्मा (प्रथम), सायेशा पाटणकर (व्दितीय), निहारिका शिंदे (तृतीय), 3 ते 5 वयोगटात श्रीशा गिरमे (प्रथम), ऋग्वेद आव्हाड (व्दितीय), अर्णव महापुरे (तृतीय) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ. अतिष काळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)