भावी पालकांची अशी हवी दूरदृष्टी !

संदीप भूशेट्टी, गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार

योग्य आर्थिक नियोजन व वाढीव खर्चांचा अंदाज योग्यरित्या घेतल्यास घरात येणाऱ्या नवीन बाळामुळे आपली आर्थिक तारांबळ होत नाही.प्रत्येक घरात बाळ येणार असताना सर्व बाबींवर मोठा परिणाम होतो. घरात येणारा हा नवीन सदस्य आनंद वाढवत असतो तसेच मोठे खर्चही वाढवत असतो. घरामध्ये बाळ आल्यानंतर होणारा वैद्यकीय खर्च व इतर प्रकारचे सर्व खर्च वाढत जातात हे जरी असले तरी पुढील वीस वर्षांमध्ये मोठ्या रकमेची गरज निर्माण होत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सगळ्यांचा योग्य अंदाज व नियोजन नीट न केल्यास केलेली अनेक वर्षांची बचत बघता बघता संपून जाते. बाळ येण्याआधीपासूनच जर योग्य आर्थिक नियोजन केले तर घरात येणारा नवीन सदस्य आनंद द्विगुणित करेल. आज आपण अशाच एका कुटुंबाचे आर्थिक नियोजन व गुंतवणूक पाहणार आहोत.

श्रीराम व सीमा यांच्या घरी काही महिन्यांमध्येच बाळ येणार आहे. पाहू या त्यांनी काय आर्थिक तयारी केली आहे.श्रीरामने वैद्यकीय खर्चासाठी – (बाळ जन्मण्यापूर्वीचा खर्च – रु. एक लाख)
(बाळाच्या जन्माच्या वेळी व नंतरचा होणारा खर्च – रु. एका लाख पन्नास हजार – सदर रक्कम श्रीरामने म्युच्युअल फंडातील लिक्विड फंडात गुंतवली आहे. त्याला यातून वार्षिक परतावा 6.5 टक्के मिळणार आहे.)

घरखर्च – बाळ आल्याने श्रीराम व सीमा यांचा मासिक खर्च वीस टक्क्‌यांनी वाढणार आहे.

विमा – श्रीरामने नवीन दहा लाख रुपयांचा वैद्यकीय विमा कुटुंबासाठी घेतला.

गुंतवणूक – दीर्घकालीन – बाळासाठी रु. 1,00,000 इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये (दीर्घकालीन- 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवले आहेत.) रु. 5,000 ची मासिक गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवण्यास सुरवात केली आहे. बाळासाठी वाढीव टर्म प्लॅन विमा कंपनीकडून घेण्याचे ठरवले.
कमी कालावधीसाठीची गुंतवणूक – दरमहा 10,000 अतिरिक्त बचत म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात करण्यास सुरवात केली. कशासाठी (वाढीव खर्च भागवण्यासाठी)

बाळाच्या पहिल्या वाढदिवसासाठी – रु. 1,00,000 डेट म्युच्युअल फंड घेण्याचे ठरवले.

श्रीराम व सीमा यांच्याकडे आर्थिक नियोजन पूर्वनियोजित असल्याने वरील सर्व खर्च सहजरित्या करणे त्यांना शक्‍य झाले. आपल्या पाल्यासाठी नेमकी कशी व कुठे गुंतवणूक करावी याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत . त्याचे काय फायदे आहेत तेदेखील आपण पाहू या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)