वाराणसी :  भावी पतीसोबत लाइव्ह चॅट करत असतानाच एक तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाराणसी येथे घडली आहे. दरम्यान, या तरुणीला गळफास घेताना पाहून तिचा भावी पती धावतपळत बीएचयूमध्ये पोहोचला. तसेच त्याने या तरुणीला रुग्णालयात दाखल केले.  या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही तरुणी बनारस हिंदू विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, ती मध्य प्रदेशमधील भौरा बैतुल येथील रहिवासी आहे. या तरुणीचा साखरपुडा 30 एप्रिल रोजी रामनगर येथील रहिवासी असलेल्या एका युवकासोबत झाला होता. तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. दरम्यान, साखरपुडा झाल्यापासूनच ही तरुणी काहीशी अस्वस्थ होती.

दरम्यान मंगळवारी सकाळी तिने आपल्या भावी पतीला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. तेव्हाच तिने लाइव्ह चॅटदरम्यान गळफास बनवला. भावी पतीने समजावल्यानंतरही ती ऐकली नाही. दरम्यान तिच्या भावी पतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत ही तरुणी राहत असलेल्या घरमालकाला झाल्या प्रकाराची कल्पना दिली आणि या तरुणीला घरातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)