भाविकांना वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ

वेद वासुदेव प्रतिष्ठान तर्फे “जपभिक्षे’ चे आवाहन
चिंचवड – प्रभू दत्तात्रयांचे ज्ञानावतार प. पू. श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पादुका दर्शन लाभ पिंपरी-चिंचवडच्या भाविकांना मिळाला. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी तीन दिवस पादुकांचे दर्शन घेतले. भाविकांना हा दुर्मिळ लाभ वेद वासुदेव प्रतिष्ठानने दिला. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मठात श्रीराम मंदिरात पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या होत्या. आग्रहास्तव 40 भाविकांच्या घरी देखील पादुकांचे पूजन झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ महामंत्राचे प्रथम उच्चारणात ब्रह्मावर्त येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सध्या वेद वासुदेव प्रतिष्ठान तर्फे प्रयत्न होत आहेत. ठिकठिकाणी भाविकांना वेद-वासुदेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प. पू. अजितदादा तुकदेव यांचे मार्गदर्शन लाभले. जन प्रबोधनात त्यांनी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री ब्रह्मावर्तची माहिती सांगितली. ब्रह्मावर्त गंगामातेच्या दक्षिण तीरावर कानपूरपासून 22 कि. मी. वर आहे. याच ठिकाणी प. पू. श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज चार चातु:मास व एकूण साडे चार वर्षे वास्तव्यास होते. सन्यासाश्रमात ब्रह्मावर्तव्यतिरिक्‍त कुठल्याच स्थानी इतके वास्तव्य केले नाही. येथेच “श्रीमद्‌ दत्तपुराणा’ ची रचना झाली व “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ महामंत्राचे प्रथम उच्चारण झाले. ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले ब्रह्मेश्‍वर महादेव मंदिर येथे आहे व तेच झाशीची राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांचे गाव आहे.  जीर्णोद्धारासाठी भाविकांना “जपभिक्षे’ चे आवाहन केले.
गुरुवारी दगडुशेठ हलवाई दत्त मंदिर येथे पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्‍या. चिंचवड येथील सर्व कार्यक्रमांचे नियोजन द्वारकानाथ खर्डे व वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या सर्व भाविकांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)