भावनिश्चिती न्यायाधिकरण कायदा का गरजेचा? (भाग-१)

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये खासदार राजीव सातव यांनी कृषी उत्पादन भावनिश्चिती न्यायाधिकरण कायदा 2018 हे खासगी विधेयक मांडले. कृषिप्रधान भारतात आज शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत भारतीय संविधानातील कलम 14, 15, 19 (1) (ग), 21 याचे सर्रास उल्लंघन होत आहे. याविरोधात शेतकऱ्यांना दाद मागण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाहक पिळवणूक होत आहे. हे विधेयक संसदेत पारित झाल्यास शेतकऱ्यांना या कायद्यान्वये स्थापित झालेल्या न्यायाधिकरणात दाद मागता येणार आहे.

“कृषी उत्पादन भाव निश्चिती न्यायाधिकरण कायदा 2018′ या प्रस्तावित कायद्यात “मानवी हक्क’, शेतकरी, अन्यायग्रस्त म्हणजे कोण (पीडित), योग्य बाजारमूल्य, अत्यावश्यक वस्तू, किमान आधारभूत मूल्य, कृषी तसेच शेतीमाल उत्पादन किंमत निश्चितीशी संबंधित मुलभूत प्रश्न म्हणजे काय यांच्या स्पष्ट व्याख्या देण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित कायाद्यान्वये स्थापित करण्यात आलेल्या न्यायाधिकरणामध्ये चेयरमन (अध्यक्ष), व्हाईस चेयरमन (उपाध्यक्ष), तज्ञ सदस्य (कमीत कमी दोन सदस्य) असतील. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्यायिक सदस्य म्हणून व कृषीविज्ञान कृषीअर्थशास्त्र विषयातील तज्ञ व्यक्ती यांच्या सहभागातून न्यायाधिकरणाचे कामकाज चालेल. चेयरमन हे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन किंवा निवृत्त न्यायाधीश असतील किंवा कोणत्याही उच्च न्यालायाचे सर न्यायाधीश असतील किंवा कमीत कमी दोन वर्षे व्हाईस चेयरमनचा अनुभव असलेली व्यक्ती असतील. व्हाईस चेयरमन हे उच्च न्यायालयाचे तत्कालीन किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा त्या पात्रतेचे व्यक्ती असतील किंवा कमीत कमी तीन वर्षे न्यायालयीन सदस्य पदाचा अनुभव असलेली व्यक्ती असतील.

भावनिश्चिती न्यायाधिकरण कायदा का गरजेचा? (भाग-२)

न्यायालयीन सदस्य हे कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा त्या पात्रतेचे किंवा मुख्य जिल्हा न्यायाधीश किंवा त्या पात्रतेचे व्यक्ती असतील. तज्ञ व्यक्ती हे कृषीविज्ञान, कृषीअर्थशास्त्र व इतर विषयातील उच्च पदवीधर किंवा या विषयातील अनुभवी व्यक्ती असतील.

– अॅॅड. असीम सरोदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)