भावनिक आशयाच्या एकांकिकाचे सादरीकरण

पुणे – नाट्यलेखणीतून विविध विषयावर भाष्य करणाऱ्या एकांकीका यंदाच्या पुरुषोत्तम करंडकमध्ये महाविद्यालयीन तरूणाई सादर करत आहे. स्पर्धेच्या 5 व्या दिवशी सादर झालेल्या एकांकीका या भावनिक आशयाच्या होत्या. आपले हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्णच होते असे नाही. अनेकांचे हे अपूर्णच राहतात. आयुष्यभर दुसऱ्याची घर बांधणाऱ्या एक गवंडीला स्वतःच घर घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहत. आयुष्यभर दुसऱ्याची घरे बांधणाऱ्या या गवंडीला स्वतःच घर घेता न आल्याने त्याच्या भावना, मानसिकता “भिंत’ या एकांकिकेतून भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नऱ्हे या महाविद्यालयाने सादर केली.

मानवाच्या गरजा या कधीही संपुष्टात न येणाऱ्या असतात. तो जसजसा मोठा होतो, तशा त्याच्या गरजा वाढत जातात. मात्र, या गरजा पूर्ण करण्यासाठी किती प्रवास करावा लागतो. अनेक अडथळे पार करत मोहापासून विवेकपर्यंत जाणे गरजेचे असते. या कथेवर आधारित “शोध’ ही एकांकिका जय क्रांती कॉलेज, कात्रज यांनी सादर केली. पूर्वीच्या काळी घरात 4 ते 5 भावंडे असली तर, त्यातील एक किंवा दोन मुलांना आजी, मामा यांकडे शाळेला पाठवायची पद्धत्त होती. मात्र, बालपणीच आईपासून दुरावलेल्या या मुलावर काय परिणाम होतो. आपल्या आईला भेटण्यासाठी त्याला काय परिश्रम करावे लागतात. ते या एकांकिकेतून सादर करण्यात आले. काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालय यांनी ही भावनिक एकांकिका सादर केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)