भावनांशी क्रूर खेळ…

नवी दिल्ली – विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकधील 39 भारतीयांच्या हत्येबद्दलचे निवेदन सभागृहात केले त्यावेळी विरोधी सदस्यांनी काहीं काळ गोंधळ थांबवला होता. त्यानंतर लगेच गुलामनबी आझाद यांनी निवेदन केले.परंतु त्यावेळी गोंधळ सुरूच राहिला. सरकारने हे 39 जण मरण पावल्याचे यापूर्वीच न सांगून त्यांच्या कुटुंबीयाच्या भावनांशी क्रूर खेळ केला आहे. त्याला उत्तर देताना अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की ते मारले गेले याची पूर्ण खात्रीलायक माहिती मिळाल्याशिवाय तसे जाहीर करणे योग्य नव्हते.

मोसूलच्या उत्तरपश्‍चिमेकडील बादूश या गावातील एका सामूहिक कबरीमधून हे मृतदेह उकरून काढून त्यांची डीएनए टेस्ट करण्यात आली आणि डीएनए पूर्णपणे जुळल्यानंतरच ते मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात आणून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. अध्यक्ष वेंकैया नायडू यांनी ही अत्यंत दु:खद घटना असल्याचे सांगून दोन मिनिटे शांतता पाळून मृतात्म्यांना श्रद्धांजली देण्याची सदनाला विनंती केली.

39 जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून कॉग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारला आठवंण करून दिली, की सरकारने गेल्यावर्षी हे सर्वजण जिवंत असल्याचे सरकारने खात्रीपूर्वक सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)