भावकीत दगडाने तुंबळ हाणामारी

वाकी- जमीन वाटप व रस्त्याच्या कारणावरून वाकी बुद्रुक (ता. खेड) गावच्या हद्दीतील संतोषनगर, भाम येथे भावकीत शिवीगाळ, दमदाटीसह दगडांनी तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सहाजण किरकोळ जखमी झाले असून, याप्रकरणी चाकण पोलिसांनी रविवारी (दि. 5) रात्री उशिरा दोन्ही गटांतील चार जणांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
देवदास बबन कड (वय 40, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड)च्या फिर्यादीवरून मारुती बाबुराव कड, निखील मारुती कड व कृष्णादास मारुती कडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कृष्णदास मारुती कड (वय 30, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड)च्या फिर्यादीवरून देवदास बबन कडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भाम येथे देवदास कड व कृष्णदास कड या दोघांच्या मालकीची जमीन असून त्यांच्यात जमीन वाटपाचे व रस्त्याच्या कारणावरून वाद सुरू आहेत. शनिवारी
(दि. 4) सकाळी नऊच्या सुमारास कृष्णदास हे त्यांच्या शेतावर जाण्याच्या प्रयत्नात असताना देवदास व त्यांची जाण्या-येणावरून बाचाबाची झाली. त्यातच चिडलेल्या देवदासने कृष्णदासला दगडाने मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. ही भांडणे सोडविण्यासाठी निखील कड हा आला असता त्यालाही मारहाण केली असल्याचे कृष्णदास कड यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. देवदास कडने फिर्यादित नमूद केले आहे की, मारुती कडने त्यांची मुले निखील व कृष्णदासला पुढे करून जमिनीच्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करून दगडाने मारहाण केली. तसेच निखीलने एका महिलेस जबर मारहाण करून अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे नमूद केले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे, विलास गोसावी व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)