भाळवणी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

भाळवणी – पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथील नागेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह भक्‍तिमय वातावरणात पार पडला. या सप्ताह काळात महेबूब महाराज शेख, पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री, गोरक्षनाथ महाराज पोटे, अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदी नामवंत महाराजांची कीर्तने झाली. श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तिसऱ्या सोमवारी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होते.

रविवारी नागेश्‍वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाच्या तसेच पारंपरिक लेझीम पथकाच्या डावाने भाविकांचे लक्ष वेधले. लहान मुली कलशाची सजावट करून मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात लहान-थोरांच्या फुगड्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. या सप्ताह काळात हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)