भाळवणी बाजारात चोरीच्या घटनांत वाढ

भाळवणी – पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथे आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मोठा बाजार भरतो. या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. या बाजारात सराईत गुन्हेगार गर्दीचा फायदा घेऊन पाळत ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना भूलवून त्यांची नजर चुकवून रोकड रकमेसह महागडे मोबाईल फोन चोरण्याचा प्रयत्न करतात. या बाजारात गेल्या दोन ते तीन आठवड्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी बाजारच्या दिवशी दुपारी दीडच्या दरम्यान काळकूप येथील शेतकरी नामदेव सटवा कावरे हे जिल्हा सहकारी बॅंकेच्या भाळवणी येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले त्रेपन्न हजार रुपये चोरून नेले. या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. परंतु पंधरा दिवस उलटले तरी अद्याप तपास लागला नाही.
भाळवणी हे बाजारपेठेचे गाव असल्याने याठिकाणी कायमच परिसरात कायमच नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे येथे मोटारसायकल, महिलांच्यागळ्यातील दागिने, मोबाईल, रोख रक्कम अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या भरदिवसा घडत आहेत. या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या बुधवारच्या आठवडे बाजारात महागडे मोबाईल फोनही चोरीला गेले आहे. या चोऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बुधवारी बाजारच्या दिवशी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कोणत्याही चोरीचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)