सातारा- सातारा शहरातील भारीप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना पुरोगामी सेवा थांबवा असे धमकीचे पत्र आल आहे.याप्रकरणी गणेश भिसे,सिध्दार्थ खरात यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.”हिंदु धर्म हेच कृत्य, आपली पुरोगामी सेवा थांबवा” असा भिसे,खरात यांना आलेल्या पत्रातील मजकुर आहे.

याप्रकरणी भारीप बहुजन महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत कळवले आहे. भिसे व खरात हे भारीपचे पदाधिकारी असल्याने धमकी देणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)