भारनियमनाने होरपळलेल्यांना “फुंकर’

औष्णिक वीजमिर्मितीची क्षमता वाढणार : केंद्राकडे अतिरिक्त कोळशाची मागणी

पुणे – आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर वीजटंचाईमुळे नागरिकांचा रोष ओढवला जाऊ नये, यासाठी राज्य शासन आणि वीजकंपनी प्रशासनांनी संयुक्तिक प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औष्णिक वीजनिर्मितीची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोळशाचा अतिरिक्त साठा मिळावा यासाठी केंद्र शासनाला साकडे घालण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच अंमलबजावणी करण्याचा संकल्प राज्य शासनाने सोडला आहे.

-Ads-

राज्यात वीजेची मागणी पंचवीस हजार मेगावॅटवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, सर्व स्रोतांची मिळून अवघी सोळा ते सतरा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. ही गरज भागविण्यासाठी खासगी स्रोतांच्या माध्यमातून जादा दराने खरेदी करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. शिवाय, उपलब्धता आणि पुरवठा यांचा समन्वय साधताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातूनच नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची ही नाराजी निश्‍चितच परवडणारी नाही. त्यामुळेच औष्णिकच्या वीजनिर्मितीची क्षमता वाढविण्याचा निर्णय राज्य शासन आणि वीजकंपन्यांच्या प्रशासनांनी घेतला आहे.

महानिर्मितीचे नागपूर, परस, पारळी, चंद्रपूर, नाशिक, खापरखेडा यासह अन्य ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. परंतु मध्यतंरी खासगी वीजनिर्मिती केंद्रांना वाव मिळावा या उदात्त हेतूने यातील चाळीस वीजनिर्मिती संच बंद करण्याचा निर्णय महानिर्मिती प्रशासन आणि राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयाचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. ऑक्‍टोंबर महिन्यात वीजेची मागणी वाढल्याने भारनियमन सुरू केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

वीजेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यास महानिर्मितीच्या वतीने प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये कंपनीला अपेक्षेपेक्षाही जादा यश आले आहे. आगामी काळात वीजेच्या मागणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. हेच लक्षात घेऊन मागणीनुसार वीजनिर्मिती करण्यावर प्रशासनाच्या वतीने भर देण्यात येणार आहे.
– महेश आफळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महानिर्मिती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)