भारधाव कार झाडावरुन आदळून एक ठार

केंजळ येथील घटना, दोनजण गंभीर जखमी
भुईंज – वाई सुरुर रस्त्यावरील केंजळ गावच्या हद्दीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भरघाव वेगात असलेली एक वेगनआर कार झाडावर जाऊन आदळली. या अपघातात मुळचे कोरेगाव तालुक्‍यातील भाडळे आणि सध्या परेल (मुंबई) येथे राहणारे प्रमोद उद्धव फणसे हे जागीच ठार झाले तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

अधिक माहिती अशी, राजेंद्र मनोहर धोत्रे (वय 45) यांचे महाबळेश्वर येथे दुकान आहे. त्या दुकानासाठी दिवाळी सणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी ते मुंबईला गेले होते. साहित्याची खरेदी झाल्यानंतर ते पुन्हा महाबळेश्वरकडे येण्यासाठी निघाले असता ते रात्री पुण्यात जेवण्यासाठी थांबले होते. जेवण उरकल्यानंतर ते पुण्यातून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी रात्री दीड वाजता वेगनआर कार (एमएच 11 बिव्ही 6940) ने निघाले. त्यांची कार सुरुर ते वाई या मार्गावर असणाऱ्या केंजळ गावानजीक आली असता चालक राजेंद्र मनोहर धोत्रे (वय 45, रा. महाबळेश्‍वर) यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेला असणाऱ्या एका झाडावर आदळून नजीकच्या ऊसाच्या शेतात पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये असलेले धोत्रे यांचे नातेवाईक प्रमोद फणसे यांना डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक राजेंद्र धोत्रे आणि विजय कुमार वर्मा हे गंभीर जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि बाळासाहेब भरणे हे सहाय्यक फौजदार आर. झेड. कोळी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच कारमधील जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातातील मृत प्रमोद फणसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. अधिक तपास सहाय्यक फौजदार कोळी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)