पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केलेल्या सुधा भारद्वाज आणि वरनॉन गोन्साल्विस यांनी वैयक्तीक मागण्यांसाठी न्यायालयात अर्ज केले आहेत. यावर 17 डिसेंबर रोजी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सुधा भारद्वाज यांनी नातेवाईकांशिवाय इतर निकटवर्तीयांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. तर मानवधिकार कार्यकर्ते वरनॉन गोन्साल्विस यांनी न्यायालयीन कोठडी दरम्यान, बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि इतर कायद्याची पुस्तके वाचना करीता मिळावीत, अशी मागणी अॅड. राहूल देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. तर, याप्रकरणात अटक करण्यात आलेले नागपूर येथील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयात जामीनाकरिता अर्ज केला आहे. त्याबाबतचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. जामीन अर्जावर आज (दि. 4) रोजी सुनावणी होणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा