भारत 2020 पर्यंत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात होणार स्वावलंबी

* 20 हजार कोटी रुपयांची होणार बचत

नवी दिल्ली : 
भारत लवकरच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवणार आहे. 2020 पर्यंत भारतीय संरक्षण संशोधन संस्था क्षेपणास्त्र विकासात पूर्णपणे स्वावलंबी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने 2022 पर्यंत भारताला क्षेपणास्त्र विकासात पूर्णपणे स्वावलंबी करण्याचे लक्ष्य बाळगले होते. जे आता निर्धारित कालावधीच्या दोन वर्षांअगोदरच प्राप्त केले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.

डीआरडीओद्वारे क्षेपणास्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने भारत आत्मनिर्भर होणार आहे, त्याचबरोबर 15 हजार ते 20 हजार कोटी रुपयांची बचत देखील होईल. अलिकडेच डीआरडीओने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ब्राह्मोस क्रूज क्षेपणास्त्र विकसित करण्यास यश मिळविले होते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा 3 पट अधिक वेगाने लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्र विकसित करण्यास आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने डीआरडीओ वेगाने पुढे सरकत आहे. 2020 पर्यंत क्षेपणास्त्र विकसित करण्यास भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत भारत अगोदरच सक्षम आहे. भारताने दीर्घ अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम अग्नि क्षेपणास्त्रांचा विकास केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)