भारत-श्रीलंका यांच्यासंबधातील फायली ब्रिटनने केल्या नष्ट

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या एफसीओ (फॉरेन अँड कॉमनवेल्द) कार्यालयाने भारत आणि श्रीलंका संबंधी 195 फाईल्स नष्ट केल्याची माहिती देण्यात आलेली आहे. एलटीटीई (लिबरेशन टायगर्स आफ़ तामीळ इलम) ने श्रीलंकेत यादवी सुरू केल्यानंतरच्या काळातील भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच्या महत्त्वाच्या दस्तावेजांचाही या नष्ट करण्यात आलेल्या फायलींत समावेश आहे. अशा महत्त्वाच्या फाईल्स नष्ट केल्याने इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक यांच्यात नाराजीची लाट पसरली आहे.

कोणत्या फाईल्स नष्ट करायच्या आणि कोणत्या फाईल्स जतन करून ठेवायच्या याचा निर्णय संबंधित देशाच्या नैतिक धोरणांवर आधारीत असतो, असे एफसीओने स्पष्ट केलेले असले, तरीही अशा प्रकारे फाईल्स नष्ट केल्याने त्या त्या काळातील इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांची काही नोंदच शिल्लक राहणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सन 1978 ते 1980 या काळात ब्रिटनच्या एमआय 5 आणि एसएएस (सिक्रेट एयर सर्व्हिस) श्रीलंकेच्या सुरक्षा दलांना सल्लामसलत दिली होती असे सांगितले जाते.

पत्रकार आणि संशोधक फिल मिलर यांनी माहितीचा अधिकारात (फ्रीडम ऑफ इन्फर्मेशन रिक्वेस्ट) काही माहिती मागितली होती, त्यावरून या फाईल्स नष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. भारताने श्रीलंकेत पाठवलेल्या भारतीय शंतिसेने (इंडियन पीस कीपिंग फोर्स) च्या कामासंबंधी माहितीही या नष्ट केलेल्या दस्तावेजांमध्ये होती असे मानले जात आहे. राष्ट्रीय संग्रहातून अशा प्रकारे ऐतिहासिक दस्तावेज काढ़ून टाकणे वा नष्ट करणे बेजायदेशीर बाब आहे. एमआय 5 आणि एसएएसने केलेल्या कामांमुळे सरकाराची मानहानी होऊ नये हा यामागचा हेतू असाअवा असे तमीळ इन्फर्मेशन सेंटरचे संस्थापक वैरामत्तू वरद कुमार यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)