भारत-श्रीलंका कसोटी : हार्दिक पंड्याच्या नावावर अनोखा विक्रम

पल्लीकल : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली. एका षटकात 26 धावा ठोकून त्याने नवीन विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे.
हार्दिक पंड्याने एका षटकात 26 धावा ठोकल्या. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता. पंड्याने पुष्पकुमाराच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर सलग दौन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार ठोकले. अशा एकूण 26 धावा त्याने केवळ 5 चेंडूत पूर्ण केल्या. पंड्याने केवळ 86 चेंडूंमध्येच 100 धावा पूर्ण केल्या. श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीतून पंड्याने कसोटीत पदार्पण केले. याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी करुन नव्या विक्रमाला गवसणी घातली होती. तर आता कसोटी कारकीर्दीतले पहिले शतक त्याने ठोकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)